मुंबई कुर्ला बस अपघातानंतर बस चालकांवर असलेल्या तणावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. कंत्राटी बस चालकावर खाजगी कंत्राटदारांकडून दबाव आणला जातोय. सुस्थितीत नसलेल्या बसेस देखील चालवण्याचा आग्रह धरला जात असल्याचं विविध कर्मचारी संघटनांनी म्हटलं आहे.