मुंबईतल्या कुर्ल्याच्या एलबीएस रोड वर मार्केटमध्ये एक भरधाव बस गर्दीत घुसली आणि या बस चालकानं बस समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक दिली. काही जण बसच्या चाकाखाली आले तर काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर एकोणपन्नास जण जखमी झालेत. या अपघातात अनेक संसारही उध्वस्त झालेत. कुर्ला अपघातात मृत झालेल्या फातिमा यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती.