म्हाडा मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लानचे अनावरण म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी १४३ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प C & D A म्हणजेच अदाणी समूहामार्फत साकारण्यात येणार आहे. देशातील हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असणारेय.. प्रकल्प मुंबईच्या नियोजनबद्ध, आधुनिक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.