अशोक खरात प्रकरण उघडकीस येऊन एक महिना पूर्ण होत आहे. 17 मार्चला खरात विरोधात पहिला महिला अत्याचाराचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. दरम्यान, SIT स्थापन होऊनही या एक महिन्यात ठोस काहीही समोर येऊ शकलेलं नाही. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कनेक्शनची फक्त मोठी चर्चा झाली. मात्र, अजूनही कुणाचेही साधे जबाबही नोंदवले गेले नाहीत असाही आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.