बातमी सांगलीतून सांगलीत वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. विद्यार्थिनी कर्नाटकच्या बेळगावातली रहिवासी आहे. ती मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती आणि त्यानंतर ती मैत्रिणीच्या घरी गेली असता तिला पेयातून गोंगेच्या गोळ्या देण्यात आल्या. दरम्यान शुद्ध आल्यानंतर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालं. त्यावेळी मुलीने पालकांना माहिती दिली आणि सांगली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली.