MHADA Home Price| म्हाडाच्या घराच्या किंमती कमी होणार, नव्यानं किंमती ठरवण्यासाठी नेमली समिती

गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या अवाच्या सवा किमती पाहून म्हाडाला आपल्या मूळ उद्देशाचा विसर पडलाय का, असा प्रश्न उपस्थित होतो. म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचे देखील नुकसान होणार नाही यादृष्टीने अभ्यास करणार आहे. पुढील तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल उपाध्यक्षांकडे सादर करणार असून त्यानंतर तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ