महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. आधी बदलापूर मग त्यानंतर पुणे आणि त्यानंतर अकोला आणि अकोला नंतर लातूर त्यानंतर कोल्हापूर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना या समोर येऊ लागल्या. बदलापूर प्रकरणानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट असतानाच विकृतांवर काही केल्या वचक बसत नाहीये. कोल्हापुरात दहा वर्षाच्या चिमुकलीवर, अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या मामाच भाचीवर अत्याचार करून तिचा जीव घेतल्याचं उघडकीस आलंय.