गाव गाड्यातील आणि सर्वसामान्य माणसाची नाळ जोडलेला नटसम्राट म्हणून नाना पाटेकर होते,अश्या शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी अभिनेते नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.. चार दिवसांपूर्वीच नाना पाटेकरांशी आपलं बोलणं झालं होतं,यावेळी त्यांना मी आणि गोपीचंद पडळकर मिळून दादा कोंडके यांचे स्मारक उभारणार असल्याचे सांगितलं होतं,त्यावेळी नाना पाटेकर यांनी आम्हा दोघांना कलंदर, अशी उपाधी देत दादा कोंडकेंच्या स्मारकाच्या उद्घाटनाला आपण येणार असल्याचं शब्द दिला होता,नाना शब्द पाळणारे होते,पण नाना शब्द सोडून गेले,नाना यांनी आपल्याला राजकारणात सांभाळून राहण्याचा सल्ला देखील दिला होता,अशी आठवण आमदार सदाभाऊ खोत सांगितली आहे.