नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतांनाच आता महापालिकेतील सत्ताधारी शिंदे शिवसेनाच खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. नाशिकरोड परिसरातील शिवसेनेचे नगरसेवक कैलास मुदलियार यांनी थेट बॅनर लावलेत... स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते उदघाटन झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या वीर सावरकर उड्डाणपुलावरील जीवघेण्या खड्डयांवरून प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे... हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे मात्र वारंवार विनंती करून सुद्धा महापालिका प्रशासन लक्ष देत नसून अधिकारी सुस्त असल्याचा आरोप बॅनरवर करण्यात आला आहे.