धाराशिव जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीच्या यादीत दिसणाऱ्या रकमांवरून अनेक शेतकरी संभ्रमात होते. मात्र आता या गोंधळामागील नेमके कारण स्पष्ट झाले आहे. आरबीआयच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार कर्जमाफीची गणना होत असल्याने कर्ज खात्यातील थकबाकी आणि कर्जमाफीच्या यादीतील रक्कम यात फरक दिसत आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जवळपास ४७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. याच संपूर्ण प्रक्रियेविषयी आणि कर्जमाफीच्या फॉर्म्युल्याबाबत जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला