नागपुरात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित विशेष सेमिनारमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाषणादरम्यान त्यांनी २०१४ पूर्वी महाराष्ट्रातील लोकांना वाघ फक्त मुंबईतच असल्याचे वाटायचे, मात्र २०१४ नंतर खरे वाघ विदर्भात असल्याचे लोकांना कळले, असे म्हणत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाघाशी तुलना करत, "हा वाघ इथे बसला आहे आणि या वाघाची प्रचिती आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल," अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.