गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले.. ही मुदत 3 ऑगस्ट रोजी संपत आली तरीदेखील शासनाकडून मतदार यादी प्रसिद्धी करण्यात आलेली नाही.. जाणीवपूर्वक गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्न सुरू आहे का असे प्रश्न दूध संस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. या विलंबामुळे राधानगरीतील पुंगाव येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये शासन आणि दुग्ध विभागास गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.