मध्य प्रदेशची राजधानी भोपाल सध्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्रस्थानी आली आहे. हजारो शेतकरी राजधानीत दाखल होत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. मूग पिकाची १०० टक्के एमएसपी दराने खरेदी करावी, खत वितरणातील टोकन व्यवस्था रद्द करावी आणि इतर कृषी मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मागण्यांबाबत सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे.