वसई तालुक्यातल्या कळंब येथील तुलसी रिसॉर्टमध्ये एका पर्यटकाने मद्यधुंद अवस्थेत गोळीबार केलाय. अर्नाळा सागरी पोलिसांनी या पर्यटकाला अटक केली आहे. मंगळवारी रात्री भिवंडीहून आलेल्या पर्यटकांच्या पार्टीदरम्यान संदेश गुरव याने गोळीबार केला. गस्तीवरील पोलिसांनी आवाज ऐकत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला गोळीबार न झाल्याचा दावा करण्यात आला, मात्र रिकामे काडतूस आढळल्यानंतर चौकशीत गोळीबार झाल्याचे उघड झाले.