नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये 580 अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.आता या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत बोगस मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी बोगस मुख्याध्यापक प्रकरणाचा तपास करताना त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवत ते बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंत नेले आहे.