नांदेडमध्ये बंजारा समाजाने मोर्चा काढलाय... मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाले... याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी किनवट तालुक्यात महामोर्चा काढण्यात आला. किनवट हा तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असलेला तालुका आहे. येत्या 29 तारखेला नांदेड मुख्यालयाला यापेक्षाही मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा सकल बंजारा समाजाने केली आहे.