हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पडळकरांचं वक्तव्य निर्लज्जपणाचा कळस आहे. सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत, त्यांना लाचार, असंस्कृत आणि बेशरम असे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी मतांची चोरी केल्याचा आरोपही त्यांनी केला.