मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सुरू असलेल्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईतील आमदार, मुंबई महापालिका आयुक्त आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कामातील दिरंगाईवर खडाजंगी होण्याची शक्यता आहे.