बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याला पारधी समाजाने तीव्र विरोध केला आहे. यामुळे त्यांच्या आरक्षणावर गदा येईल, अशी भीती पारधी समाजाला आहे. आरक्षण काढून घेतल्यास पुन्हा चोऱ्या करायच्या का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या मागणीसाठी पारधी महासंघाने राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे.