विदर्भ हा नेहमीच कोणाचा बालेकिल्ला असेलच असे नाही, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विदर्भाने यापूर्वी वेगवेगळे निकाल दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांनी भाजपच्या बालेकिल्ल्यावर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उभे केले असून, स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांना जास्त वाटा हवा आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.