मराठा क्रांती मोर्चाने मनोज जरांगे यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. हैदराबाद गॅझेटमुळे समाजाचा कोणताही फायदा झाला नाही, असा आरोप अभ्यासकांनी केला आहे. या आरोपांवर मनोज जरांगे यांनीही पलटवार करत, समाजासाठी काय योगदान दिलं, असा सवाल विरोधकांना विचारला आहे.