पालघरमध्ये वनविभागाने केलेल्या मोठ्या कारवाईत 12 कोटी रुपयांचे दुर्मिळ रक्तचंदन जप्त केले आहे. साखरे गावात ही मोठी कारवाई करण्यात आली असून, रक्तचंदन तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी अधिक माहिती दिली आहे.