नांदेडच्या कंधार तालुक्यातील हाळदा गावात ग्रामसभेदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्याने गावागावात असे वाद वाढताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.