मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठं संकट आलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील बहिर गावात पूर आणि पावसामुळे केवळ पिकंच नाही, तर अख्खी शेतीच वाहून गेली आहे. शेतात तब्बल पाच ते आठ फुटाचे खड्डे पडले आहेत. हे विदारक चित्र शेतकऱ्यांच्या दुर्दशेची कहाणी सांगत आहे.