सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे संकट आले आहे. जिल्ह्यातील 110 पैकी 40 महसुली सर्कलमधील 489 गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे सीना आणि भीमा नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत.