Nandurbar ZP Polls | नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? महायुतीतील वादाचा काँग्रेसला होणार फायदा?

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं, तर विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मित्रपक्षांच्या मदतीशिवाय कोणत्याही एका पक्षाला सत्तेची चावी मिळणार नाही. सध्या महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमध्ये जागावाटपावरून आणि स्थानिक मुद्यांवरून धुसफूस वाढल्याचे चित्र आहे. जर ही अंतर्गत गटबाजी निवडणुकीत कायम राहिली, तर महायुतीच्या या वादाचा थेट फायदा नंदुरबारमध्ये तुल्यबळ असलेल्या काँग्रेसला होऊ शकतो आणि सत्ता समीकरणे बदलू शकतात.

संबंधित व्हिडीओ