शनिवारी सायंकाळपासून पावसाने नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. जवळपास सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतय. कांदा, मका, द्राक्ष, सोयाबीन, डाळिंब, भात यांसह भाजीपाल्याला पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील शिवाजी काकड या शेतकऱ्याच्या 5 एकरवरील टोमॅतेचे मोठे नुकसान झाले आहे. एकरी 2 लाख रुपये खर्च त्यांना आला होता मात्र आता उत्पादन खर्च तरी निघेल की नाही ? असाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय..