पावसाळ्याच्या सुरुवातीला वेळेत पाऊस झाला, शेतकरी सुखावला आणि पेरणीची लगबग सुरु झाली. काळ्या मातीत हिरवं सोनं बहरायला लागलं. पण नियतीच्या अर्थात निसर्गाच्या मनात वेगळंच काही होतं. ऑगस्टमध्ये सुरु झालेला पाऊस अजूनही असा काही बरसतोय की, देवा... असा का कोपलास? असं विचारण्याची वेळ मायबाप शेतकऱ्यावर आलीय. चांगलं पिक येणार म्हणून आता कुठे तो सुखावला होता, पण दरवर्षीप्रमाणे यंदाही हे सुख त्याच्या नशिबी नव्हतं. राज्यात झालेल्या अतिवृष्टीनं लाखो हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय. काही भागात पिकांसह मातीही वाहून गेलीय. घरं मोडून पडलीत, संसार उघड्यावर आलेत. अशावेळी बळीराजाला आज खरंच आधाराची गरज आहे. मायबाप सरकार आधार बनून आपल्या पाठिशी राहील, अशी आशा तो बाळगून आहे... राज्यात विविध भागात आज काय स्थिती आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट