PM Modi Writes Foreword To Giorgia Meloni's Memoir | मेलोनींच्या आत्मचरित्रात मोदींची प्रस्तावना

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची जगभरात एक वेगळीच क्रेझ आहे. पुरुषांच्या राजकीय विश्वात आत्मविश्वासानं वावरणाऱ्या त्या महिला नेत्या आहेत. युरोपमधील एका महत्त्वाच्या देशाचं म्हणजेच इटलीचं त्या नेतृत्व करतात. जागतिक प्रश्नांवरची त्यांची बेधडक मतं व्यक्त करतानाही त्या बधत नाहीत. अशा मेलोनींनी त्यांचं आत्मचरीत्र लिहिलं आणि त्याला प्रस्तावना लिहिलीय ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी... मोदींसह मेलोनी यांचे मैत्रीपूर्ण संबंधही अनेकदा चर्चेत असतात, अशात मोदींनी मेलोनी यांच्या आत्मचरीत्रासाठी लिहिलीय इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्र "I Am Giorgia – My Roots, My Principles" च्या भारतीय आवृत्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावना लिहिली आहे दरम्यान रुपा पब्लिकेशन्सद्वारे लवकरच हे पुस्तक भारतात लाँच केलं जाणार आहे. तर मेलोनी यांनी हे आत्मचरीत्र २०२१मध्ये लिहिलं होतं तेव्हा त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. त्यांचं हे आत्मचरीत्र इंग्लिशसह इतर युरोपीय भाषांमध्येही अनुवादित करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ