जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचे छत कोसळून दोन मुले ढिगाऱ्याखाली दाबल्या गेली.. या दुर्घटनेत महेश पाटील या मुलाचा गुदमरून मृत्यू झाला तर योगेश चव्हाण हा मुलगा गंभीर जखमी झालाय.. त्याच्यावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. गेल्या काही दिवसांपासून पाचोरा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुन्या मातीच्या घरांची पडझड होत आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर प्रशासनानेही मदतीसाठी यंत्रणा तैनात केली...