गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पावसामुळे मराठवाड्यात हाहाकार पाहायला मिळतोय... अशात आज पासून पुढील तीन दिवस मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असणार आहे... 3 ऑक्टोबर पर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे... दोन दिवसात मराठवाड्यात एकूण 96.60मि.मी. पाऊस पडलाय..तर 330 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे.., त्यामुळे 07 व्यक्ती आणि 283 जनावरे मयत झालेली असून 1272 घरांचे नुकसान झालेले आहे.