जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने आज मोठं यश मिळवलंय.. भारत 4 ट्रिलियन डॉलर्सची जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय.. भारताने जपानला मागे टाकत चौथ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान मिळवलाय.. अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आता भारत चौथी आर्थिक अर्थव्यवस्था झालाय.. दरम्यान याच गतीने भारताची प्रगती झाल्यास अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असा विश्वास नीती आयोगाचे प्रमुख सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केलाय..