वैष्णवी हगवणेच्या मुलाला घेऊन जाणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. निलेश चव्हाणवर बावधन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात लुकआउट नोटीसही पोलिसांनी जारी केली आहे मात्र पोलिसांनी या प्रकरणात जाणून बुजून वेळकाढूपणा केलाय असा आरोप आता कसपटे कुटुंबियांनी केलाय.