Jalgaon जिल्हा बँकेच्या संचालक सदस्य निवडीवरून राडा, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंच्या PAवर संतापले

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक सदस्य निवडीवरून राडा.खोट्या सह्या करून ठराव पारित केल्याचा आरोप.आमदार चंद्रकांत पाटील खडसेंच्या पीएवर संतापले.राडा वाढल्यानंतर खडसेंच्या पीएचा काढता पाय.या ठरावावर खोट्या सह्या करून ठराव पारित करण्यासाठी एक अधिकारी राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर गेल्याचा गंभीर आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी एकनाथ खडसेंचे पीए योगेश कोलते कार्यालयात आले मात्र, आमदार चंद्रकांत पाटील हे कोलते यांच्यावरच भडकल्याने योगेश कोलते यांनी अखेर काढता पाय घेतला. गेल्या एक तासापासून आमदार चंद्रकांत पाटील संताप व्यक्त करत असून, या संपूर्ण प्रकरणावरून कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालंय

संबंधित व्हिडीओ