पालघरमधील दापचरी येथे फ्रान्सच्या 'रुंगीस मार्केट'च्या धर्तीवर 1 हजार 395 एकर जागेवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारली जाणार आहे.पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला मिळाली. त्यामुळे हा प्रकल्प देशातील शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणारा महत्त्वाचा लॉजिस्टिक हब ठरेल.या भव्य प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर तब्बल १० हजार रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.यात स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले जाईल.महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही नागरिकाचे विस्थापन न करता सरकारी पडीक जमिनीवर हा ऐतिहासिक प्रकल्प वेगाने पूर्ण केला जाणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री रावल यांनी व्यक्त केला.