पोलिसांनी ऋषिराज सावंतच्या नोंदवलेल्या जबाबात नवीन माहिती समोर आली आहे. मित्राची सासुरवाडी बँकॉक मध्ये असल्याचा जबाब त्यानं नोंदवला कुटुंबाचा मात्र व्यावसायिक कामांसाठी जात असल्याचा दावा केलाय. ऋषिराज ने विमान कंपनीला अडुसष्ठ लाख नव्हे तर अठ्ठ्याहत्तर लाख मोजले होते. कुटुंबामध्ये परस्पर विरोधी दावे समोर आलेत. बजाज एव्हिएशन कंपनी चे फालकोन त्वो थाउजंड एलेक्स हे चार्टर्ड विमान होता. ऋषिराजने या कंपनीला जीएसटी आणि इतर करांसह अठ्ठ्याहत्तर लाख रुपये दिले होते. एकीकडे मित्राची सासुरवाडी असल्याचा जबाब दिलेला आहे आणि त्यासाठीच आम्ही चाललेलो होतो असं ऋषिराजने म्हटलेलं आहे.