मालेगाव बॉम्बस्फोट दोन हजार आठ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं भाजपच्या भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी केलेली आहे. सर्व आरोपींना कायदेशीर कृत्य यूएपीए च्या कलम सोळा अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा युक्तिवाद मुंबईच्या विशेष न्यायालयामध्ये एनआय च्या वतीनं करण्यात आला.