राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये अनेक ठिकाणी अडचणी येतायत. काही ठिकाणी राजकीय नेते अडचणी निर्माण करत असून मुख्यमंत्र्यांनी याविषयी कठोर भूमिका घेतलेली आहे. झेरो टॉलरन्स पॉलिसी ठेवत जागोजागी प्रकल्प होत असताना आमदारांकडूनच अडथळे आल्यास अधिकाऱ्यांवर दबाव आल्यास कोणत्याही पक्षानं हस्तक्षेप केल्यास त्याला उचलून जेल मध्ये टाका असे स्पष्ट आदेशच आता मुख्यमंत्र्यांनी दिले.