Pahalgam Terror Attack| पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश, पिंपरी-चिंचवडला अद्याप आदेश नाही

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा, असा आदेश केंद्र सरकारने दिलाय.तसे आदेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाला प्राप्त झाले नाहीत.मात्र उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानातून आलेल्या हिंदुना पिंपरी चिंचवड शहराने आश्रय दिलाय.सध्या शहरात 111 पाकिस्तानी नागरिक हे भारताचे नागरिकत्व मिळवण्याच्या तयारीत आहेत.शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे परदेशी नागरिकांचे शहरात येण्याचे प्रमाण अधिक आहे.अद्याप शहरात सार्क व्हिसावर एकही पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास नाही.अशी माहिती परदेशी नागरिक विभाग आणि पासपोर्ट पडताळणी विभागाचे प्रमुख नितीन लांडगे यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ