दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. २६ सप्टेंबरला पंढरपुरात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चापूर्वी आमदार आणि शेतकरी विठ्ठल मंदिरात जाऊन सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करणार आहेत. दरम्यान, मोर्चाच्या नियोजनासाठी पंढरपुरात बैठक पार पडली. मात्र या बैठकीला आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे.