नाशिकच्या पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके हातची गेली तर रब्बीच्या आशाही धूसर झाल्या आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. कुटुंब कसे चालवावे, मुला बाळांचे शिक्षण कसे करावे, पुढच्या पावसाळ्यापर्यंत जनावरे कशी जगवावी या विवंचनेत शेतकरी आहे. मंगरूळ येथील एका सुकलेल्या सोयाबीनच्या शेतातून नुकसानीचा आढावा घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतीनिधी निलेश वाघ यांनी.