बीडमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच मोर्चादरम्यान आमदार रोहित पवारांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय. येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, तर समृद्धी महामार्गावर एकही गाडी फिरू देणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिलाय.. आम्ही पवार साहेबांचे पट्टे आहोत.. दिलेला शब्द पाळल्याशिवाय राहत नाही, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारला थेट आव्हान दिलंय.