पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरलंय. त्यामुळं शहरवासीयांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. याच पवना धरणातून आता पवना नदीत 4,300 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आलाय. परिणामी पवना नदीवरील केजुबाई बंधारा ओसंडून वाहतोय. केजुबाई मंदिराला ही पाण्यानं स्पर्श केलाय. याचं पाण्यात पाणकोंबड्या आनंद घेतायेत, माशांची शिकार करुन, स्वतःची भूक भागवत आहेत. सोबतचं मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात उत्पादक शेतकरी ही सुखवलेला आहे. इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी.