पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील स्मशानभूमींमधील नादुरुस्त विद्युत दाहिन्यांच्या मुद्द्यावरून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. वारंवार तक्रारी करूनही दाहिन्यांची दुरुस्ती होत नसल्याने आक्रमक झालेल्या मोरे यांनी, प्रशासनाने संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करावीत, अन्यथा सुधारणा न करणाऱ्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळू, असं अत्यंत धक्कादायक वक्तव्य केलं. दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
Pimpri Chinchwad | BJP corporator makes controversial statement; threatens to burn a contractor alive during the general body meeting.