विचार करा, तुम्ही ज्या घरात आज राहत आहात, ज्या शहरात तुमचं आयुष्य गेलंय, ते संपूर्ण शहर एका रात्रीत समुद्राच्या तळाशी निघून गेलं तर? तुमचं घर, तुमची जमीन, तुमची ओळख... सगळं काही कायमचं पाण्याखाली गायब झालं तर? हा कोणताही काल्पनिक चित्रपट किंवा हॉलिवूडचा थरारपट नाही... तर युनायटेड नेशन्स म्हणजेच UN च्या एका ताज्या आणि अतिशय भयंकर रिपोर्टने संपूर्ण भारताची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची झोप उडवलीय..काय आहे हा धक्कादायक रिपोर्ट... पाहुया