अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सामूहिक जेवणाच्या पंगतीबाबत मोठी घोषणा केलीय. भंडारा, लंगर, इफ्तार पार्टीचं आयोजन करताना आता एफडीएची परवानगी घेणं बंधनकारक असेल. याबाबतची माहिती सात दिवस आधीच द्यावी लागणार आहे. याशिवाय कॅटरर्सच्या चालकाला कच्चा माल कुठून घेतला याचीही माहिती द्यावी लागणार आहे.