मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारने आपली भूमिका जाहीर केलीय. जरांगेंच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत काय पावलं उचलली आणि योजनांच्या अंमलबजावणीतल्या आतापर्यंतच्या प्रगतीची माहितीच सरकारने जरांगेंसमोर सादर केलीय. पण त्याचवेळी जरांगेंच्या यावेळच्या उपोषणापासून सरकारने विशिष्ट अंतर राखल्याचंही दिसतंय. त्यामुळे जरांगेंचं यावेळचं आंदोलन सरकार नेहमीसारखं हाताळेल, याची शक्यता दिसत नाहीए..पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट