पुण्यातील यू-ट्यूबर संतोष पंडित यांना पोलिसांनी अटक केलीय.. रात्री एक वाजता कोथरुड पोलिसांनी संतोष पंडित यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं.. संतोष पंडित यांनी कोथरुडमधील विकासकामांबाबत यू ट्यूबवरील व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण करताना अश्लील शेरेबाजी केली होती. त्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात संतोष पंडीत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे संतोष पंडीत यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर काल रात्री एक वाजता कोथरुड पोलिसांचे पथक संतोष पंडीत रहात असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना अटक करण्यात आली. मात्र, यावेळी रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला..