आज जागतिक महिला दिनानिमित्त विरारमध्ये भव्य अशा पिंक मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरण तसेच महिलांच्या आरोग्या विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार महानगरपालिकेचे महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. 14 वर्षापासून ते 75 वर्षाच्या आजीबाईसह दिव्यांग महिला देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या.