बातमी पावसाची आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे. दादर, माहीम, वरळी, वांद्रे या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी मुंबईमध्ये बरसत आहेत. रोजच्या उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे.